Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव शहरात कोरोनाचा स्फोट : ३५९ पॉझिटीव्ह रूग्ण !

जळगाव प्रतिनिधी । प्रशासन प्रयत्नांची शर्थ करत असतांनाही कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास तयार नसून आज जळगावात विक्रमी ३५९ रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. अलीकडचा विचार केला असता जळगाव शहर, चाळीसगाव, चोपडा आदी तालुक्यांमध्ये पेशंटची संख्या सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. मात्र आजची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जळगाव शहरातील प्रचंड रूग्णसंख्या होय. आज तब्बल ३५९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

जळगाव शहराच्या कान्याकोपर्‍यात कोरोनाचा संसर्ग आढळून आल्याचे अधोरेखीत झाले आहे. एकीकडे कोरोनाचे लसीकरण सुरू असतांना दुसरीकडे प्रचंड प्रमाणात आढळून आलेले रूग्ण हा आरोग्य यंत्रणांना चिंतेचा विषय आहे. प्रशासनाने रात्रीच्या संचारबंदीसह अन्य उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिक मात्र याचे पुरेपूर पालन करतांना दिसत नाहीत. याचमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर जळगाव शहरात पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे साडे तीनशेच्या पेक्षा जास्त रूग्ण आढळून आल्याची बाब ही जळगावकरांची धास्ती वाढवणारी आहे.

Exit mobile version