Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसीकरणाचा वेग मंदावला; आज फक्त ३० केंद्रांवर लसीकरण

जळगाव प्रतिनिधी। लसींच्या टंचाईमुळे जिल्ह्यात अनेक केंद्रांवरील लसीकरण थांबले असून अन्य ठिकाणी मंदावल्याचे दिसून येत आहे. तर आज जिल्ह्यात फक्त ३० केंद्रांवर दुसर्‍या डोसचे लसीकरण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या लसीकरणासाठी नागरिक उत्सुक असून प्रशासनानेही जय्यत तयारी केलेली आहे. तथापि, नवीन डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाला ब्रेक लागला आहे. याचमुळे सध्या शिल्लक असलेल्या ४९२० कोविशिल्ड व २०० कोव्हॅक्सिनचे डोसचे जिल्ह्यातील केवळ ३० केंद्रावर लसीकरण होणार आहे. कोविशील्डचे ४ हजार ९२० डोस शिल्लक आहेत. ते केवळ ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यासाठीच वापरण्यात येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय ८५०, जळगाव येथील शाहू रुग्णालय २३००; मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय ७० (१० कोव्हॅक्सिन), चोपडा उप जिल्हा रुग्णालय ३० कोव्हक्सिन, पारोळा ग्रामीण रुग्णालय १९० कोविशिल्ड (९० कोव्हॅक्सिन), रावेर ८० कोविशिल्ड, यावल ३०, भडगाव (१० कोव्हॅक्सिन), बोदवड ४० (१० कोव्हॅक्सिन), एरंडोल ११० (४० कोव्हॅक्सिन), पिंपळगाव हरेश्‍वर (पाचोरा) १५०, पहूर ३०, न्हावी (ता.यावल) ६०, सावदा ४०, वरणगाव ९०, मेहुणबारे (ता.चाळीसगाव) १२०, अमळगाव ३०, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी १५०, फैजपूर २८०, पाचोरा ३० (१० कोव्हॅक्सिन), एणगाव (ता.बोदवड) १०, कासोदा १०, तळई ३०, रिंगणगाव ४०, धामणगाव ५०, कानळदा ४०, म्हसावद ४०, पाडळसा ३०, सावखेडासीम २० असे डोस उपलब्ध आहेत. त्यातून संबंधीत गावांमधील ३० केंद्रावर लसीकरण होईल.

दरम्यान, भुसावळ, चाळीसगाव आदींसारख्या मोठ्या शहरांमधील लसी संपल्या असल्याने येथे शनिवारी एकाही केंद्रावर लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version