Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज बाधितांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त !

Jalgaon Corona News : More Patients Cured Than Infection

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण बरे होण्याचा वेग वाढला असून आज बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. तर, जिल्ह्यात आज २० जणांचा मृत्यू झालेला आहे. चिंताजनक बाब म्हणजे अमळनेरात संसर्ग पुन्हा वाढीस लागला आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर- १९३, जळगाव ग्रामीण-५७, भुसावळ- १२०, अमळनेर-१७१, चोपडा-५५, पाचोरा-३३, भडगाव-२१, धरणगाव-४४, यावल-४२, एरंडोल-४१, जामनेर-७७, रावेर-४५, पारोळा-३७, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-५४, बोदवड -३१ आणि इतर जिल्ह्यातील ४  असे एकुण १ हजार ७० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख १६ हजार ८६८ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ३ हजार ८९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ८९९ बाधित रूग्ण विविध कोवीड  रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात आज जिल्ह्यात २० रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा २ हजार ७८ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version