Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील कोरोना रूग्णसंख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील आजवरच्या एकूण कोरोना रूग्णसंख्येने आज २० हजारांचा टप्पा पार केला असून आजवर शहरातील ३३३ रूग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रूग्ण हा २८ मार्च २०२० रोजी जळगाव शहरातच आढळून आला होता. यानंतर सातत्याने शहरातील रूग्णसंख्या वाढीस लागली आहे. मध्यंतरी रूग्णसंख्या कमी झाली असली तरी अलीकडे पुन्हा एकदा रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. या अनुषंगाने आज दिवसभरात २६४ नवीन बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता जळगाव शहरातील रूग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा पार केला आहे.

आजवर जळगाव जिल्ह्यात २०,११२ इतके कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. ३५५ दिवसांमध्ये शहरातील रूग्ण संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थात, या कालावधीत दिवसाला सरासरी अंदाजे ५७ पेशंट आढळून आले आहेत. यातील १६,८७९ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर सध्या ३००० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच कालावधीत ३३३ रूग्णांचा जीव गेला आहे.

Exit mobile version