Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ९८२ कोरोना रूग्ण; जळगाव, भुसावळ, चाळीसगावात स्फोट !

जळगाव प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये जळगाव जिल्ह्यात तब्बल ९८२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरासह भुसावळ, चाळीसगाव, चोपडा आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- ३३६, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-१९८, अमळनेर-१४, चोपडा-७४, पाचोरा-३०, भडगाव-१, धरणगाव-८, यावल-१३, एरंडोल-४, जामनेर-४०, रावेर-१८, पारोळा-४७, चाळीसगाव-१४२, मुक्ताईनगर-४, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण ९८२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आज जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात एकुण ६८ हजार ६६२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार ७१३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरात दोन तर जळगाव ग्रामीण, भुसावळ आणि चोपडा तालुक्यातून प्रत्येकी एक असे एकुण ५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून संसर्ग वाढीस लागला असल्याने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. आता भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, पारोळा आदी तालुक्यांमधीलही रूग्ण संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासन आता सतर्क झाले आहे.

दरम्यान, आज दिवसभरात पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांचा आकडा आता १४३२ इतका झालेला आहे.

Exit mobile version