Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज पुन्हा नऊशे पार कोरोना बाधीत ! : जळगाव शहरात स्फोट

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांप्रमाणेच आजही जिल्ह्यात नऊशेच्या पार म्हणजेच ९५६ इतके कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर यातील तब्बल ३४१ रूग्ण हे जळगाव शहरातील असल्याने येथील संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-३४१, जळगाव ग्रामीण- ४८, भुसावळ-११७, अमळनेर-२४, चोपडा-१०६, पाचोरा-३२, भडगाव-३२, धरणगाव-५८, यावल-२४, एरंडोल-१८, जामनेर-७२, रावेर-१, पारोळा-६, चाळीसगाव-४६, मुक्ताईनगर-२५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ६ असे एकुण ९५६ रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्ह्यात एकुण ७२ हजार ५७५ रूग्ण आढळून आले. त्यापैकी ६३ हजार २७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ८ हजार ९३ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज सहा रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील भुसावळ तालुक्यातील दोन तर चोपडा, धरणगाव, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी कळविले आहे.

Exit mobile version