Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात ९५४ कोरोना बाधीत; जळगावात तीनशे पार रूग्ण !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रशासनाने आज रात्रीपासून जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला असला तरी याचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९५४ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहरातील ३१० पेशंटचा समावेश आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर- ३१०, जळगाव ग्रामीण-४२, भुसावळ-७०, अमळनेर-१८, चोपडा-१२१, पाचोरा-१७, भडगाव-२१, धरणगाव-५७, यावल-३०, एरंडोल-९८, जामनेर-३१, रावेर-९, पारोळा-७, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातून ४ असे एकुण ९५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आज जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात एकुण ६७ हजार ६८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार २४८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर चोपडा आणि बोदवड तालुक्यातून प्रत्येकी एक असे एकुण ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version