Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ११९४ कोरोना बाधीत; चोपड्यात ‘हॉटस्पॉट’ कायम

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी गत चोवीस तासांमध्ये ११९४ कोरोना बाधीत Corona Positive रूग्ण आढळून आले आहेत. यात चोपडा तालुका हा हॉटस्पॉट बनला असून येथे सर्वाधीक तब्बल २९३ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ११९४ कोरोना बाधीत Corona Positive आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहर व चोपडा तालुक्यातील असत. आज चोपडा तालुक्यात पुन्हा संसर्ग पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या तालुक्यात तब्बल २९३ रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर जळगाव शहरात २८४ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

आज जिल्ह्यात जळगाव शहर-२८४, जळगाव ग्रामीण-२०, भुसावळ-१०६, अमळनेर-२७, चोपडा-२९३, पाचोरा-३३, भडगाव-११०, धरणगाव-६४, यावल-४७, एरंडोल-२५, जामनेर-२५, रावेर-१०, पारोळा-३१, चाळीसगाव-७४, मुक्ताईनगर-११, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातील १९ असे एकुण १ हजार १९४ रूग्ण आढळून आले आहे.

कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ८५ हजार ४८३ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७२ हजार ७४२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार १५५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-३, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-४, धरणगाव-२, यावल-२ आणि रावेर १ असे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अमळनेर तालुक्यातील २ वर्षीय बालकाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन आणि होळी तसेच धुलीवंदनाच्या कालावधीत संसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने आजपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने एक हजारांच्या वर कोरोना बाधीत रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

आजच्याच वर्षाला जळगाव जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला होता. म्हणजे एका वर्षात एक रूग्ण ते ११९४ इतका पल्ला गाठला गेला असून कोरोनाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

Exit mobile version