Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात चाकूचा धाक दाखवत दोघांना लुटले

जळगाव प्रतिनिधी । रस्त्यावर दुकाची लावून दोन मित्रांना अज्ञात तिघांना धक्काबुक्की व चाकूचा धाक दाखवत तीन मोबाईल व रोकड असे एकुण 28 हजाराचा मुद्देमाल पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात तिघा भामट्यांविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यश जयंत पाटील (वय-19) रा. प्लॉट नं. 04, संपन्न अपार्टमेंट, शिवराम नगर आणि त्याचा मित्र नरेश सदाशिव बारी रा. नेपानगर जि. बऱ्हाणपूर (म.प्र.) ह.मु. सिध्दी गणपती मंदीर शिवकॉलनी यांच्या सोबत दुचाकी (एमएच 19 सीएल 6593) ने मेहरूण तलावाच्या पुढे असलेल्या जळगाव शिरसोली रोडवरील हॉटेल आमंत्रण येथे जेवणासाठी जात होते. रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तलावावर दोघेजण गप्पा मारत बसले असतांना अज्ञात तिन भामट्यांनी दोघांना धक्काबुक्की व चाकूचा धाक दाखवत करत दोघांच्या खिश्यातील पाकिट आणि तीन मोबाईल असा एकुण 28 हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी यश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसांत अज्ञात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version