Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव सी.ए .शाखेस भारतीय सनदी लेखाकार संस्थांच्या पश्चिमी क्षेत्रीय टीमने दिली भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया मुंबई विभागाच्या कार्यकारी मंडळाने रविवार २७ ऑगस्ट  रोजी जळगाव शहरातील गजानन कॉलनी येथील सी.ए. शाखेस भेट दिली.  या प्रसंगी मुंबई डब्लु. आय. आर. सी. समिती सदस्यांची जळगाव सी. ए. शाखेच्या माजी अध्यक्षांसोबत चर्चात्मक बैठक पार पडली.

याप्रसंगी जळगाव शहरातील सी.ए. क्षेत्रामध्ये ३० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचा तसेच जळगाव सी.ए. शाखेच्या मार्गदर्शक समिती सदस्यांचा मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. .मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे मा. अध्यक्ष सी. ए. अर्पित काबरा, सेक्रेटरी सी. ए. सौरभ अजमेरा, कोषाध्यक्ष सी. ए. केतन सैया, विद्यार्थी शाखा अध्यक्षा सी.ए. पिंकी केडिया तसेच जळगाव सी.ए. शाखेच्या नॉमिनी आर.सी.एम. सी.ए. श्वेता जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जळगाव सी.ए. शाखेच्या व्यवस्थापन समितीमार्फत सर्व मान्यवरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर अध्यक्षा सी. ए. ममता राजानी केजरीवाल यांनी सर्व मान्यवरांची थोडक्यात ओळख करून दिली आणि आतापर्यंत घेतलेल्या आणि उर्वरित वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला.  यावेळी सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचाही मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे मा. अध्यक्ष सी. ए. अर्पित काबरा आणि आदी मान्यवरांनी जळगाव सी. ए. शाखेच्या सभासदांसोबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महिला सी.ए. सदस्यांसोबत  तसेच जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेच्या कार्यकारी मंडळासोबतसुद्धा चर्चात्मक बैठक पार पडली.

ज्या सी.ए. सभासदाबद्दल काही संभ्रम असल्यास संबधित सभासदावर प्रत्यक्ष आरोप न करता आधी जळगाव सी.ए. शाखेमध्ये त्या सभासदाबद्दल माहिती काढून आपण आपले संभ्रम दूर करू शकतो. त्याचप्रमाणे आय.सी.ए. आय. हे आर्थिक व कर साक्षरता अभियान राबवीत आहे ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा कसे सामावून घेता येईल याबद्दल प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला कराविषयी काही माहिती घेणे असल्यास मोफत टॅक्स क्लिनिक सुरु करण्यात आले आहे असे सांगण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत मान्यवरांनी सांगितले.

याप्रसंगी आर. सी. एम. सी.ए. पियुष चांडक यांचे प्रमाणन आणि साक्षांकित कार्यावरील अलीकडील प्रकरणे या विषयावर सविस्तर चर्चासत्रसुद्धा आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आर. सी. एम. सी.ए. पियुष चांडक यांनी सर्व सी.ए. सभासदांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी जळगाव सी. ए. शाखेच्या अध्यक्षा सी. ए. ममता राजानी केजरीवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. अभिषेक कोठारी, सेक्रेटरी सी.ए. हितेश आगीवाल, कोषाध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, कार्यकारी मंडळ सदस्य सी.ए. सोहन नेहेते व तत्काळ माजी अध्यक्ष सी.ए. विकी बिर्ला यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. केदार पांडे यांनी केले व आभार प्रदर्शन सी.ए. हितेश आगीवाल यांनी केले.

Exit mobile version