Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव बसस्थानकातून ३० किलो गांजासह दोघांना अटक

5005f427 d0ba 4d6d a79d f19c6b2375a6

जळगाव प्रतिनिधी |भुसावळकडून अहमदाबाद येथे दीड लाखांचा गांजा घेऊन जात असतांना दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात गांजा तस्करी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की भगवान सोनवणे (वय 25 रा. फेकरी ता. भुसावळ) आणि तन्वीर संजू तडवी (वय 19 रा. हरिओम नगर, यावल) हे दोघे जळगाव बसस्थानकात संशयित या दोन काळ्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी नाना तायडे, प्रशांत जाधव, हेमंत तायडे, जगन सोनवणे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार खात्री करण्यासाठी त्यांनी बस स्थानकात तपासणी केली असता दोन जण संशयरित्या बॅग घेऊन बसल्याचे आढळून आले. दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यात गांजा असल्याचे आढळून आले. दोघांना जिल्हापेठ पोलिसात आणून पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गांजाची किंमत साधारण 1 लाख 55 हजार रुपये एवढा असल्याचा अंदाज आहे.

Exit mobile version