Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील घरफोडीचे आरोपी ताब्यात : टी.व्ही. हस्तगत

L E D Thief

जळगाव, प्रतिनिधी | खंडेरावनगरातील टिपू सुल्तान चौक येथील सगिर सलीम देशमुख याच्या शेतकर्‍याचे घरातून चोरट्यांनी एलईडी टी.व्ही., ४० हजार रुपये रोख, सोन्याच्या पाच ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण ७४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गेल्या महिन्यात १४ रोजी घडली होती. सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या १२ तासात रामानंदनगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून खंडेराव नगरातील दोघांसह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
चोरट्यांकडून गुन्ह्यातील एलईडी टी.व्ही. जप्त करण्यात आला आहे.

 

खंडेराव नगरातील टिपू सुल्तान चौक येथे सगीर देशमुख हे आई, वडील, भाऊ व पत्नी मुलांसह राहतात. शेती करुन ते आपला उदरनिर्वाह चालवतात. बहिणीचे लग्न झाल्यानंतर ३० जूनपासून सगीर हे कुटुंबियांसह देशमुख वाडा, बोरनार. ता.जळगाव येथे वास्तव्यास गेले आहेत. ४ जुलै रोजी दुपारी २.०० वाजता सगीर हे खंडेराव नगरातील टिपू सुल्तान चौकातील आपल्या घरी आले होते. त्यानंतर १० जुलैला ते पुन्हा खंडेराव नगरातील घरी आले असता त्यांना कुलूपाचा कोयंडा तुटलेला, घरात कपडे व सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला, तसेच पत्नीची पर्सही पडलेली दिसली. घरातील टि.व्ही.ही जागेवर नव्हता, शेजारी हमीदा खाला व नसरुन बी मोहसीन खान यांच्याकडे त्यांनी त्याबद्दल विचारपूस केली. चोरट्यांनी घरातील एलईडी टीव्ही, ४० हजार रुपये रोख व २४ हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ७४ हजारांचा ऐवज लांबवलेला असल्याचे त्यांना आढळून आले होते. चोरीची खात्री झाल्यावर ५ ऑगस्ट रोजी सगीर यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरिक्षक रोहिदास ठोंबरे यांना संशयित हे पिंप्राळा तसेच खंडेराव नगर परिसरातील असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास ठोंबरे, गुन्हे शोध पथकातील रवी नरवाडे, भूषण पाटील, अतुल पवार, संतोष पाटील याच्या पथकाने आज (दि.६) दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास इरफान उर्फ इप्पो युसूफ पठाण (वय २२), शरीफ शेख शफी उर्फ फैय्याज (वय २२) दोन्ही रा.खंडेराव नगर, शोएब शेख युनूस (वय २०) रा. आझाद नगर, पिंप्राळा या तिघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये किंमतीची एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Exit mobile version