Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसबीआयचे एटीएम फोडून १४ लाखांची रोकड लंपास

सीसीटिव्हीत दिसले तीन चोरटे

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेचे बाहेरील एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडून तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून अवघ्या ३८ मिनीटात एटीएम फोडले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसांनी धाव घेतली असून एमटीएम मशीन तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास करीत आहे.

रहिवाशांच्या आले लक्षात
याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशी योगेश शिवाजी जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती बँक शाखा व्यवस्थापक दिवेश अर्जून चौधरी यांना दिली. त्यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
प्राथमिक तपासणीमध्ये संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या एटीएममध्ये अजून सात लाख रूपयांची रोकड असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलीसांनी बँकेने लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. यात तीन जण तोंडाला रूमाल बांधून मध्यरात्री १ वाजून ५५ मिनीटांनी दाखल झाले. दोन्ही एमटीएम गॅस कटरने फोडून रोकड घेवून तीने चोरटे २ वाजून ३३ मिनीटांनी एटीएमच्या बाहेर पडले. यावेळी सोबत चारचाकी गाडी असल्याचे समजते.

पोलीस पथक घटनास्थळी
या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बँकेतील सीसीटिव्हीची मदतीने पोलिसांचा तपास सुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरू असतांना पहिल्यांदा काही दिवस गुन्हेगार निवांत होते. मात्र अलीकडच्या काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आढळून आले असून आता चक्क एटीएम फोडल्याने पोलीस यंत्रणे समोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Exit mobile version