Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नंदकुमार बेडसे यांची नियुक्ती

jalgaon Crime news 1

जळगाव प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 11 जणांच्या बदल्या करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील रिक्त पदावर धुळे येथील अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नंदूरबार येथील अपर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर जगदाळे यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले.

बदली झालेले अपर जिल्हाधिकारी (कंसात नवीन नियुक्ती)
पुण्यातील उपायुक्त दिपक नलावडे (अपर जिल्हाधिकरी, विमानतळ विकास कंपनी, पुणे)
साधना सावरकर (पुनर्वसन विभागीय आयुक्त, पुणे)
पुणे, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे (पुनर्वसन विभागीय आयुक्त, नाशिक)
सातारा, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड (अपर जिल्हाधिकारी, पुणे)
धुळे, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे (अपर जिल्हाधिकारी, जळगाव)
नंदूरबार, अपर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर जगदाळे (अपर जिल्हाधिकारी, धुळे)
मुंबई उपनगर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती वैदेही रानडे (अपर जिल्हाधिकारी, ठाणे)
लातूर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक (मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड- नवनगर विकास प्राधिकरण, पुणे)
श्रीमती नयना बोंदार्डे (रो.ह.यो.उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे)
भारत बास्टेवाड (महाव्यवस्थापक- भूमी व सर्वेक्षण, राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई) आणि
रविंद्र खेबूडकर (अपर जिल्हाधिकारी बीड)

Exit mobile version