एचआयव्हीसह जगणार्‍या वधू-वरांचा परिचय मेळावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर व शिव अस्तित्व सेवा फाउंडेशन यांच्यावतीने येथे जिल्हाधिकारी परिसरात असणार्‍या अल्पबचत भवन येथे एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या व्यक्तींसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी १०१ व्यक्तीने आपला परिचय दिला. यावेळी पाच एचआयव्ही सहज जीवन जगणार्‍या व्यक्तींचा विवाह ठरला आहे.

जळगाव येथील अल्पबचत भवन मध्ये घेण्यात आलेल्या वधु वर परिचय मेळाव्याचे उदघाटन सरहज फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिताताई माळी यांच्या हस्ते करण्यात आले. एचआयव्ही सह जीवन जगणार्‍या व्यक्तींच्या वधू वर मेळाव्यासाठी गुजरात ,अहमदाबाद ,सुरत, नाशिक ,धुळे ,पुणे, मुंबई ,अकोला ,परभणी ,धाराशीव, नांदेड, वाशिम ,अशा विविध जिल्ह्यातून उपस्थितांनी या कार्यक्रमात परिचय दिला.

या कार्यक्रमासाठी आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष भारती पाटील , शिव अस्तित्व सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सविता साठे, महिला बालकल्याण समिती सदस्या देवयानी गोविंदवार, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा चांडक, जिल्हा एड्स नियंत्रक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, बालकल्याण समिती सदस्य संदीप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. या वधू वर मेळाव्या प्रसंगी एचआयव्ही सहज जीवन जगणार्‍या पाच व्यक्तींचा विवाह ठरला आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी विहान काळजी व आधार केंद्राचे बाह्य संपर्क अधिकारी व पदाधिकारी शिव अस्तित्व सेवा फाउंडेशनचे सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content