Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव रूग्णवाहिकेने महिलेस उडविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुसुंबा येथील ४८ वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील (वय ४८) या आपल्या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह वास्तव्याला होत्या. गेल्या आठ दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी असल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संगीताबाई पाटील ह्या आज शुक्रवार ६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्यासाठी निघाल्या होत्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधा वेगाने येणार्‍या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच १९ सीवाय ७०९१) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. ही घटना घडल्यानंतरच त्याच रुग्णवाहिकेतून संगीताबाई पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version