Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठा दिलासा : अखेर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविडच्या सावटातून अखेर जिल्ह्याची मुक्तता झाली असून दोन वर्षे आणि सात दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे.

मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. यानंतर पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेशंट आढळून आले होते. तर विशेष करून दुसर्‍या लाटेत मृत्यूंची संख्यादेखील लक्षणीय होती. दरम्यान, लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्यास तिसर्‍या लाटेचा फटका बसला नाही. काही दिवसांपासून जिल्ह्यात खूप कमी रूग्ण आढळून येत आहेत. तर आज जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या रिपोर्टनुसार आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण उरलेला नाही.

प्रशासनाच्या रिपोर्टनुसार जळगाव जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर चार रूग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रीय पेशंट उरलेला नाही. यामुळे दोन वर्षे आणि सात दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे कालच जिल्हाधिकार्‍यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यातील निर्बंध उठविले आहेत. या पार्श्‍वभूमिवर कोरोनामुक्तीची बातमी ही नवीन उभारी देणारी ठरली आहे.

Exit mobile version