Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव पब्लिक स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जळगाव पीपल्स बँक आणि रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित जळगाव पब्लिक स्कूल मध्ये ‘ग्रीन डे’ साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

मंगळवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शहरातील जळगाव पीपल्स बँक आणि रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित जळगाव पब्लिक स्कूल मध्ये ‘ग्रीन डे’ साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेच्या प्रांगणात पालकातील महिला आणि पुरूष यांच्या वेगवेगळ्या गटात अंतर्गत स्पर्धा घेण्यात आले. यात लिंबू चमचा आणि धावण्याची शर्यत घेण्यात आले. या स्पर्धातील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

गणेशोत्सवाची आरास
सोमवारपासून गणपती उत्सवास सुरूवात झाले. त्यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रम राबवून सजिव आरासाची मांडणी करण्यात आली. यात सकाळी सामूहिक गणपतीची आरती केली जाते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version