Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली

 ‘राष्ट्रीय स्वच्छता अभियाना’त सहकाऱ्यांनी अतिरिक्त श्रमदान करीत कार्यरत परिसरात साफसफाई 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड, गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टसह कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व सार्वजनिक स्तरावातील सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पुर्वदिवशी विशेष ‘स्वच्छांजली’ मोहिम राबविण्यात आली.

सहकाऱ्यांनी अतिरिक्त श्रमदान करीत कार्यरत परिसरात साफसफाई केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व सहकाऱ्यांना ‘स्वच्छांजली’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.

जैन अॅग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क मधील सर्व सहकाऱ्यांनी फुड पार्कच्या मेन गेटपासून ते जुना जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहिम सकाळी १० ते ११ यावेळेत राबविली. यात प्लास्टीक कचरासह पर्यावरणाचे संवर्धन याविषयीसुद्धा जनजागृती करण्यात आली. स्वच्छांजली मोहिमेत विजय मुथा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. अनिल पाटील, पी. एस. नाईक, आशिष भिरूड, सी. आय. देसर्डा, श्री. ललवाणी, बालाजी हाके, संजय पारख, विकास मल्हारा, विजय जैन, अनिल जोशी, डॉ. भारद्वाज, संजय चौधरी, सुनिल खैरनार, सुनील गुप्ता, विनोद पंडीत, व्ही. पी. पाटील, डॉ. मिश्रा, संजय सोन्नजे, जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, डॉ. ठाकरे, राजेश आगीवाल, अभिजीत शुक्ल, अतुल इंगळे, डॉ. इंगळे, दीपक चांदोरकर, डॉ. जयश्री. महाजन, अझिझ खान, आर. बी. येवले, सतिश खडसे, गांधी रिसर्च फाऊंडेशन चे उदय महाजन, गिरिश कुलकर्णी, मदन लाठी,  सुधीर पाटिल, नितिन चोपडा, जे. बी माथ्यू, अनुभूती स्कूलचे श्री. भुसांडे,  विक्रांत जाधव, भिकन खम्बायत यांच्यासह प्रत्येक विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते. यामध्ये जैन फुड पार्क मधील टिश्यूकल्चर लॅबमधील महिलांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेत कार्यलयीन आवारात विशेष स्वच्छता मोहिम राबवली.

तर जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील सहकाऱ्यांनी जैन प्लास्टिक पार्कच्या मुख्य गेट पासून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते बांभोरी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छांजली मोहीम राबविली. यात कंपनीचे सेक्रटरी अवधुत  घोडगावकर, सी. एस. नाईक, लक्ष्मीकांत लाहोटी, दिलीप येवलेकर, व्ही. एम. भट, राजीव सरोदे, एस. सुकुमार, अशोक कटारिया, दिलीप सांखला, हेमंत पेढणेकर, विजय शुक्ला, सतिषचंद्र मंगल, मिलींद खारूल, राजेंद्र महाजन, सुनील शहा, महेश इंगळे, अतीन त्यागी, राजश्री पाटील, अश्विनी खैरनार, संगिता खंबायत, श्रद्धा घारे, माया गुजराथी, चारूलता पाटील, नेहा ठाकरे यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्यांसह सर्व विभागातील सहकारी सहभागी झालेत. दरम्यान प्लास्टीक पार्कच्या सहकाऱ्यांनी टाकरखेडा व पाळधी येथेसुद्धा स्वच्छांजली मोहिम राबविली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन इरिगेशनच्या स्वच्छांजली उपक्रमाचे कौतूक करत सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला.

पर्यावरणाचे संरक्षण, आरोग्यहित रक्षण व अपघातमुक्ती अशा त्रिसुत्री असलेल्या अभियानात सार्वजनिक परिसरांची स्वच्छता राखणे हि आपली वैयक्तिक तसेच सामुदायिक जबाबदारी आहे अशी शिकवण देणाऱ्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संस्थात्मक स्तरावरील सहभाग जैन इरिगेशन सिस्टीम्स व विविध आस्थापनांनी तसेच सामाजिक अंग असलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांनी सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षण, आरोग्यहित रक्षण व अपघातमुक्ती ह्या उदात्त अभियानात स्वेच्छापुर्वक उत्स्फूर्त सहभाग सहकाऱ्यांनी घेतला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छांजली’ मोहिम यशस्वीतेसाठी संजय सावंत, बाळू साबळे, आर. एस. पाटील, किशोर पाटील यांच्यासह हाऊसकिपींग विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

Exit mobile version