Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जैन, देवकरांचा ७ जून रोजी फैसला ; काही संशयित गैरहजर राहिल्यामुळे निकाल लांबणीवर

333979 jaindeokare

 

धुळे (वृत्तसंस्था) संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहाराचा आज निकाल जाहीर होणार होता. परंतु काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 जून रोजी होणार आहे. दरम्यान, या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे निकाल काय लागतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

या संदर्भात अधिक असे की,जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत आज धुळे जिल्हा कोर्टात निकाल घोषित होणार होता. परंतु 48 पैकी चार जण आज गैरहजर होते. काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जूनला ठेवली आहे.

 

घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. दरम्यान, हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील यांना न्यायालयात बोलावण्यात आल्याचे देखील कळते. तसेच संशयित आरोपींची हजेरी घेतली असता त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. तर गैरहजर संशयितांविरोधात अजमीन पत्र वॉरंट काढण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांनी केली आहे. दरम्यान, या घोटाळ्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा या संशयितांना झाल्यास त्यांना निवडणूक लढता येणार नाहीय. त्यामुळे हा निकाल माजी मंत्री सुरेशदादा जैन व गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा राजकीय जीवनावर परिणाम करणारा असणार आहे.

Exit mobile version