Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात अहिंसा यात्रेचे जैन बांधवानी केले स्वागत (व्हिडिओ)

 

मुक्ताईनगर,  प्रतिनिधी । महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर शहरामध्ये अहिंसा यात्रेचे आगमन झाले. या यात्रेचे सकल जैन समाजातर्फे स्वागत करण्यात आले.

 

मुक्ताईनगर शहरामध्ये महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिंसा यात्रेचे सदभावना, नैतिकता, नशामुक्ती असा संदेश देत आगमन झाले. आचार्य, श्री. महाश्रमनजी व त्यांच्यासोबतचे जैन समाजाचे गुरू महाराज एकूण ७० असे आहेत.आतापर्यंत आचार्य, श्री महाश्रमनजी व त्यांच्या सोबतचे  गुरुमहाराज यांनी भूटान, नेपाळ व त्यानंतर परतीचा प्रवास भारतामध्ये करत आहे से एकूण आजपर्यंत ५०  हजार किलोमीटरचा प्रवास पायी चालत चालत शांततेचा, अहिंसेचा संदेश देत तिन्ही राष्ट्रांमध्ये देत आहे. आज महाराष्ट्रमधून ते पुढे मध्यप्रदेशकडे रवाना होतील. बुऱ्हाणपूर,इंदोर त्यानंतर भीलवाडाकडे जातील अशी माहिती सकल जैन समाज बांधव यांनी दिली. तसेच सकल जैन समाजातर्फे आज महावीर भवन येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,  खासदार, रक्षा खडसे , आमदार, चंद्रकांत पाटील, जिल्हा बँक चेअरमन, रोहिणी खडसे खेवलकर यांनी सर्वांनी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे दर्शन घेतले.

 

Exit mobile version