Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाने केली होमगार्डला अरेरावी; एकावर गुन्हा

Crime l 3

जळगाव प्रतिनिधी । गणपती मिरवणूकीच्या दरम्यान एका तरुणाने होमगार्डच्या अंगावर बुक्का उगारला. तसेच त्याच्या अंगावर गुलाल फेकुन शिवीगाळ करून मारहाण केली. सोमवारी दुपारी ३.३० वाजता अजिंठा चौफुलीजवळ ही घटना घडली.

मनोज राजेश कोळी (वय २२, रा.रामेश्वर कॉलनी) हे होमगार्ड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसोबत सोमवारी अजिंठा चौफुली येथे गणपती बंदोबस्ताच्या ड्युटीवर होते. दुपारी ३.३० वाजता ऑटो आयकॉन या कंपनीच्या गणपतीची मिरवणूक निघाली होती. यावेळी वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे होमगार्ड कोळी यांनी त्यांना हटकले. यानंतर मिरवणूकीत नाचत असलेल्या उमेश जयवंतराव पाटील रा. तरसोद याने कोळी यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलुन त्यांच्या अंगावर बुक्का उगारला. तसेच अंगावर गुलाल फेकुन शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे उमेश पाटील याला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. होमगार्ड कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरुन उमेश पाटील याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version