Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोळी बांधवांनी आदिवासी दिन साधेपणाने साजरा करावा- बाविस्कर

चोपडा प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे कोळी समाजबांधवांनी यंदाचा आदिवासी दिन हा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

या संदर्भात जगन्नाथ बाविस्कर यांनी पत्रकात नमूद केले आहे की, कोळी समाजाने आपण आदिवासी असल्याचा अभिमान बाळगावा. कायद्याचा आदर करून स्वाभिमानाने आपापसातील वादविवाद,भांडणतंटे,संघर्ष मिटवुन इतर समाजाशी सुध्दा सलोख्याचे संबंध ठेवावेत. कोरोनाच्या महामारी पासुन घर-परिवार, गांव व समाजाचे संरक्षण करावे. गांवातील कोरोना योध्द्यांना सर्वतोपरी मदत करून स्वत् ही काळजी घ्यावी.

शासनाच्या आदिवासी विभागातर्फे दि.९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणुन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघात आदिवासींमध्ये कोळी समाजाची सर्वात जास्त लोकसंख्या असल्याने हा मतदारसंघ अनु.जमातीसाठी राखीव आहे. तालुक्यात ज्या गावांमध्ये आदिवासी कोळी समाज आहे,त्याठिकाणी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून मिरवणुक न काढता दि.९ ऑगस्ट २०२०,वार रविवार रोजी स.९ वा.आपापल्या गांवातील,चौकातील,प्रत्येक घराघरांतील म.वाल्मिकी ऋषींची मुर्ती,प्रतिमा,फलक यांचे विधीवत पुजन व नमस्कार करून आदिवासी दिन मोठ्या आनंदाने साजरा करावा.असे आवाहन चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ टि.बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version