शेगाव नगरपरिषदेतर्फे गरजूंसाठी जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज अभ्यासिका

शेगाव प्रतिनिधी । शेगाव नगरपरिषदेच्या वतीने गरजू विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज अभ्यासिका अत्याधुनिक स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. इच्छुकांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेच्या अध्यक्ष शकुंतला बुच यांनी केले आहे. 

ही अभ्यासिका अद्ययावत असून सुसज्ज इमातीत हजारो पुस्ते, ग्रंथ संपदा, विविध तज्ञांचे मार्गदर्शन, संगणक कक्ष, कॉन्फरन्स हॉल, वातानुकूलीत बैठक व्यवस्था ही उपलब्ध आहे.  शेगांव व परिसरातील ग्रामिण भागातील, दुर्बल घटकातील विद्यार्थीची अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणे त्यांना धेय्यप्राप्तिसाठी व्यासपिठ नगर परिषद मार्फत देण्यात येत आहे. नियमित स्वरुपात पुर्णवेळ, अर्ध वेळ बॅचेस सुरू करण्यात येत आहे. प्रशिक्षक आँनलाईन सुविधा, संगणक सुविधा, चर्चासत्र, शासकीय योजनांची क्षेत्रभेट व काम करण्याचा अनुभव ई देण्याचा प्रयत्न आहे.  शेगांव शहरातील व परीसरातील इच्छुक यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. सध्याचे कोरोना साथरोगाचे कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण व ईतर ऑनलाईन पुरक उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. तसेच सदर उपक्रम हा स्वायत्त असल्याने अत्यल्प दरात करण्यात येत आहे .

यासाठी नगराध्यक्षा शकुंतला बुच, उपाध्यक्षा सुषमा शेगोकर, गटनेते शरद अग्रवाल, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, अभियंता संजय मोकासरे, ग्रंथपाल रिनाक सोळंके यांच्यासह नगरपरिषदेचे नगरसेवक आदी परिश्रम घेत आहे.

 

Protected Content