Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळके विकासो चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील जळके येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील जळके येथील विकासोची पंचवार्षिक निवडणूकीसाठी मंगळवार, दि. ७ जून रोजी सकाळी विकासो कार्यालयात चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी सहाय्यक सहकारी अधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी नवनियुक्त संचालक जगन्नाथ पाटील, सुमित्राबाई चव्हाण, चंद्रशेखर पाटील, भागचंद जैन, अर्जुन पाटील, आधार पाटील, पंडित राखुंडे, आधार पटवळे, अशोक पाटील, इंदुबाई पाटील,  ज्ञानेश्वर चव्हाण व ताराचंद पवार हे उपस्थित होते.”

यावेळी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देवून  सत्कार करण्यात आला. यावेळी जळके येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे जळगाव तालुकाध्यक्ष रमेश पाटील, जळगाव आत्मा समिती अध्यक्ष पी.के.पाटील,  माजी चेअरमन धनराज पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, प्रा.संजय पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पटवळे, राजु चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version