Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जे.टी. महाजन यांची जयंती साजरी

3aed2708 6bcb 4168 b67b e602396bc569

 

यावल (प्रतिनिधी) शहरातील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी दादासाहेब जे.टी. महाजन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन तसेच संस्थेचे संचालक नितीन महाजन, मुख पाहुणे म्हणून श्रीकांत गायधने, माधुरी गायधने तसेच अजय फेंगडे ,’आयटीआय’चे प्राचार्य वाघूळदे सर, वि.पी.चौधरी या सर्वांनी माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे.टी. महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभीवादन केले. यावेळी स्व. जे. टी. महाजन यांनी केलेल्या शेतकरी समाजहित शैक्षणीक व सहकार क्षेत्रातील त्यांनी केलेल्या विधायक कार्याच्याआठवणींचा उजळ मान्यवरांनी मार्गदर्शन पर माहीतीव्दारे विद्यार्थ्यांना करून दिले. शाळेचे समनव्यक विकास पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी जावळे आणि रंजना पाटील हे देखील प्रसंगी उपस्थितीत होत्या. शाळेतील विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Exit mobile version