Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे उद्या रक्तदान शिबिर

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | स्व. दादासाहेब जे टी महाजन व स्व डिगंबर शेठ नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे दिनांक २२ रोजी यावल आणि रावेर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनामुळे सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या अनुषंगाने स्व. दादासाहेब जे टी महाजन व स्व डिगंबर शेठ नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे शुक्रवार दिनांक २२ रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही शिबिरे यावल आणि रावेर तालुक्यात आयोजीत करण्यात आली असून २२ रोजी न्हावी येथे याला प्रारंभ होणार आहे.

सामाजिक जाणीव म्हणून दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज,फैजपूर तर्फे करण्यात येत आहे.

 

Exit mobile version