Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे.के. पार्कमधील इलेक्ट्रीक मोटार चोरणारे दोघे ताब्यात

chor

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जे. के. पार्क येथील कारंजातील इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरून जे. के. पार्क येथे वॉचमन म्हणून काम करणारे मोतीलाल भावसार वय 66 हे गेल्या सहा वर्षापासून वॉचमन म्हणून काम करत होते. 6 जून 2019 रोजी रात्री 8 वाजेच्या कामावर हजर झाले. रात्री 1.30 वाजेच्या सुमारास ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान जे. के. पार्कमध्ये फेरफटका मारत असताना कारंजा मध्ये मध्यभागी बसलेली लोखंडी पाइप दिसले नसल्यामुळे त्यांना संशयास्पद चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पाहणी केली असता इलेक्ट्रिक पाण्याची मोटर जागेवर दिसून आली नसल्याने त्यांना चोरी झाल्याचे समजले. मोतीलाल भावसार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली दोन जण भंगाराचे दुकानांकडे जात असताना बळीराम लहू निकम त्याच्या हातात लोखंडी पाईप घेऊन जाताना दिसला त्यांची चौकशी केली असता बळीराम लहू निकम रा.गवळीवाडा तांबापुरा आणि टिपू उर्फ बहिर्या शेख सलीम राहणार बिस्मिल्ला नगर, तांबापुरा त्यांनी 5 हजार रुपये किमतीची दीडस फोर इलेक्ट्रिक पाण्याची मोटर आणि 500 रुपये किमतीचे लोखंडी पाईप चोरी केल्याचे कबूल केले. दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Exit mobile version