Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी लागणार 80 हजार कोटी

पुणे प्रतिनिधी । प्रत्येक भारतीयापर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी रुपये आहे, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? असा प्रश्न पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. यामुळे कोरोनाचे लसीकरण महागडे असेल असे संकेत मिळाले आहेत. 

पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे असे अदर पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

“मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण, तशी आपल्याला योजना आखावी लागेल. आपल्या देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल” असे अदर पूनावाला यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे. सिरम इन्स्टिट्यूटने करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे.

 

Exit mobile version