Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष अवघड नाही- पंतप्रधान मोदी

जळगांव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कोरोना विषाणू संसर्ग काळात संसर्ग प्रदुर्भाव नियंत्रणासाठी भारताने दीडशेपेक्षा जास्त देशांना औषधी, लसचा पुरवठा केला असून भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष अवघड नाही. सध्यस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत असून भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृतमहोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशनकार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर अशा अनेक योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असून लडाख, बिहार, त्रिपूरा, कर्नाटक, गुजरात व हिमाचल प्रदेशातील केंद्रीय योजनेचा लाभार्थ्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात दूरदृश्य प्रणालीसंवाद साधला.

 

शेवटच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या 
योजना केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या आहेत. तसेच यापुढेही अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीवरुन बोलतांना केले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच नागपुर जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजना व इतर केंद्रीय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांना योजनांचा लाभ मिळण्यात काही अडीअडचणी संदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी आ. गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी खा. उन्मेष पाटील, आ. गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version