Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…हा तर ‘फर्जीकल स्ट्राईक’- उध्दव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । भाजपने रात्रीतून जणू काही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा आव आणला तरी हे ‘फर्जिकल स्ट्राईक’ असल्याचा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

आज दुपारी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्रीत पत्रकार परिषद घेतली. यात ठाकरे म्हणाले की, अलीकडच्या काळात राजकारणात जे काही सुरू आहे ते पाहता निवडणूका घेऊच नये असे वाटते. भाजपने रात्रीतून चक्र फिरवली असली तरी हे फर्जिकल स्ट्राईक असल्याचा टोला त्यांनी मारला. तर आपण काँग्रेस व राष्ट्रवादीसह पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा आशावाद व्यक्त करून त्यांनी एकोप्याचा संदेश दिला.

Exit mobile version