Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांद्रयान मोहिमेसाठी इस्त्रोला मिळाला मानाचा पुरस्कार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने मोठी कामगिरी केली आहे. अवकाश क्षेत्रातील मानाचा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. चांद्रयान-३ मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्त्रोला देण्यात आला आहे.

चंद्राच्या दक्षिण धुव्राजवळ उतरणार भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे. इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Exit mobile version