Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईश्वर महाजन यांना ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पत्रकारिता अॅवार्ड’ प्राप्त

eshwar mahajan purskar

अमळनेर, प्रतिनिधी | येथील पत्रकार तथा शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांना २३ डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमात ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पत्रकारिता अॅवार्ड २०१९’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 

‘डब्ल्यू.सी.पी.ए.’ या संस्थेचे अमेरिकेचे अध्यक्ष डॉ.ग्लेन मार्टिन व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे, तहसीलदार प्रशांत पाटील, जेष्ठ गांधीवादी समाजसेवक प्रा.ई.पी.मेनन, बंगोलरचे अर्थतज्ज्ञ प्रा.नरसिंहा मूर्ती, अध्यक्ष दत्ता विघावे यांच्या हस्ते त्यांना सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह, डब्लू.सी.पी.ए.चे सभासदत्व देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या ‘दैनिक साईमत’ मध्ये दिलेल्या एका वर्षातील २१ बायनेम बातम्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विषयावर उत्कृष्ट लेखन याची संस्थेने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात एकमेव निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी चे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version