उमेदवारी देण्याचा अधिकार तरी आहे का? अजित पवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार असूनही आगामी काळात शिवसेनेचे उमेदवार असतील असे वक्तव्य शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केले, यावरून उमेदवारी देण्याचा अधिकार तरी आहे का? अशी तिखट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असून यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन घटक पक्ष आहेत.  आणि शिरूरमध्ये अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार असून आढळराव पाटील यांचा पराभव करून निवडून आले आहेत.  असे असताना शिरूरमध्ये  पुढच्यावेळी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होतील, असे वक्तव्य शिवसेना खा. संजय राऊत यांनी केले. राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या खेडमधील आंबेगाव येथे शिवाजी आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

यावर संजय राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरे वाटावे, यासाठी ते वक्तव्य असावे. उद्या मलासुद्धा जिथे शिवसेनेचा खासदार आहे तिथे माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्साह वाढावा यासाठी उमेदवार जाहीर करेल. पण उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिकीट देण्याचा अधिकार मला आहे कि शरद पवारांना. शिवसेनेचे तिकीट देण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे कि संजय राऊत यांना अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

Protected Content