Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकासनिधी काय तुमच्या घरचा आहे? – चंद्रकात पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने सर्वच अपक्ष आमदाराना बोलावून विकास निधी देण्यावरून धमक्या दिल्या असल्याचा आरोप करीत विकासनिधी काय तुमच्या घरचा आहे? असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुक निकालानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात असून निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी विजय संपादन केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले कि, राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने सर्व अपक्ष आमदारांची बैठक बोलवून, मत नाही दिले तरी अजून पुढची अडीच वर्ष आमचे सरकार आहे, त्यामुळे विकास निधीसाठी तुम्हाला आमच्याकडेच यावेच लागेल. त्यामुळेच शिवसेनेला अर्थात मविआला मतदान करा, अशा धमक्या शिवसेनेनं दिल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी करीत, विकासनिधी काय तुमच्या घरचा आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेच्या धमकावण्याविरोध आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घ्या, असा आग्रह धरला. आम्ही त्यांना सांगितले, गेल्या २४ वर्षात राज्यात राज्यसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आणि निवडून येण्यासाठी आमच्या भाजपाची ३० मते आहेत, त्यामुळे तुम्ही कशासाठी हट्ट धरता. पण त्यांनी ऐकले नाही, असेही पाटील म्हणाले.

Exit mobile version