Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकशाहीत बारामतीमध्ये जाण्यास आणि सभा घेण्यास मनाई आहे का? : मुख्यमंत्री

mumbai cm devendra fadanvis bjp

पुणे (वृत्तसंस्था) बारामतीत दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी सभाच घ्यायच्या नाही का? बारामतीत ३७० कलम लागले आहे का?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बारामतीत मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न झाला, त्याबाबत महाजनादेश यात्रेने पुण्यात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

बारामतीत महाजनादेश यात्रेदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का? बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का?, तुम्ही (शरद पवार) देखील आमच्या इथे येऊन सभा घ्या. आम्ही तुम्हाला मदत करू”, असे उत्तर त्यांनी राष्ट्रवादीला दिले. तसेच माजी खासदार उदयन राजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये भरती सुरू राहणार असे सांगितले. महाजनादेश यात्रेने आतापर्यंत ३,०१८ किमीचा प्रवास पूर्ण केला. १०७ मतदार संघात ही यात्रा आतापर्यंत पोहोचली, अशी माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version