Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

IPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव

दुबई- आयपीएल 2020 च्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा 44 धावांनी पराभव केला. या मोसमातील चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.

चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या चेन्नईला 20 षटकात 7 बाद 131 धावांपर्यंत मजल मारता आली. पृथ्वी शॉ आणि कगिसो रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पृथ्वी शॉने 64 धावांची खेळी केली तर रबाडाने 3 गडी बाद केले.

दिल्लीने 176 धावांचे दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची खराब सुरुवात झाली. शेन वॉटसन 14 धावा करून अक्षर पटेलच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायर हातात झेल दिला. यानंतर मुरली विजय देखील एनरिच नोर्त्जेच्या चेंडूवर बाद झाला. विजयने 10 धावा काढल्या.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 3 गडी बाद 175 धावा केल्या. दिल्लीच्या पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये आपले 5 वे अर्धशतक झळकावले. त्याने 64 धावा केल्या. पृथ्वीशिवाय ऋषभ पंतने नाबाद 37, शिखर धवनने 35 आणि श्रेयस अय्यरने 26 धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिस 5 धावा करून नाबाद राहीला. तर चेन्नईच्या पीयूष चावलाने 2 आणि सॅम करनने एक गडी बाद केला.

दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात पहिल्या विकेटसाठी 94 धावांची सलामीची भागीदारी झाली. ही चेन्नईविरुद्ध दिल्लीची दुसरी मोठी सलामीची भागीदारी आहे.

Exit mobile version