Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्ली कॅपिटल्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय

दुबई- येथे झालेल्या आयपीएलच्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रोहमर्षक विजयाची नोंद केली. यात सुपर ओव्हरमध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आपल्या पहिल्याच सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर सुपर विजय संपादन केला. यंदाच्या लीगमधील हा पहिला सुपर ओव्हरमधील विजय ठरला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघानेही ८ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा काढून सामना टाय केला. सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लावण्यात आला. यात दिल्लीचा संघ वरचढ ठरला.दिल्लीने आयपीएलमध्ये दुसर्‍यांदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाची निराशाजनक सुरुवात झाली. पृथ्वी शॉ (५) आणि शिखर धवन (०) ही सलामीवीराची जोडी सपशेल अयपशी ठरली. त्यापाठोपाठ हेटमेयर (७) बाद झाला. अखेर कर्णधार अय्यर (३९),ऋषभ पंत (३१) व स्टोइनिस (५३) यांनी झंझावाती खेळी केली. दिल्लीकडून खेळताना श्रेयस अय्यरने ३७ आणि ऋषभ पंतने ३१ धावा केल्या. अखेरीस मार्कस स्टॉयनिसने २१ तुफान फटकेबाजी करत २१ चेंडूत ५३ धावा केल्या. दिल्लीचे ७ खेळाडूंनी दहाचा आकडा देखील पार करू शकले नाही. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने १५ धावा देत ३ बळी घेतले.

दिल्ली कॅपिटल्स संघाने सुपर ओव्हरमध्ये धडाकेबाज विजय नोंदवला. सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हरचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ३ चेंडूत २ बाद २ धावा काढल्या. दिल्लीच्या रबाडाने दोन धावा देत त्यानंतर सलग दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. तीन धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली संघाने बिनबाद लक्ष्य गाठले. ऋषभने दोन धावांचे योगदान दिले. गोलंदाज शमी अपयशी ठरला.

Exit mobile version