दिल्लीचा धमाका : कोलकाता नाईट रायडर्स १८ धावांनी पराभूत

शारजाह : दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला १८ धावांनी पराभूत केले. नितिश राणाने ३५ चेंडूंत ५८ धावा केल्यानंतर इयॉन मॉर्गनने १८ चेंडूंत ४४ धावांचा तडाखा दिला. मात्र दिल्लीकरांनी बाजी मारली.

शारजाहच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने पाचव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. पण, धवन २६ धावा करुन माघारी परतला. धवन बाद झाल्यानंतरही पृथ्वी शॉने आपला धडाका कायम राखत ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार मारत ६६ धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि शॉने संघाचे शतक धावफलकावर लावले. पण, नागरकोट्टीने शॉला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. त्यानतंर अय्यरने ऋषभ पंतच्या साथीने धावांचा वेग वाढवला. रसेलने पंतला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयस अय्यरला ३८ चेंडूत ८८ धावांपर्यंतच मजल मारता आली. पण, त्याच्या या धुवांधार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने २२८ धावांचा डोंगर उभारला.

दिल्ली कॅपिटल्सच्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने सुनिल नारयाण ( ३ ) माघारी जावूनही दमदार सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिल आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नितीश राणाने दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागिदारी रचली. अमित मिश्राने शुभमन गिलला २८ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर नितीश राणाची ३५ चेंडूत केलेली ५८ धावांची खेळी हर्षल पटेलने १३ व्या षटकात संपुष्टात आणली. त्याने पाठोपाठ दुसऱ्याच चेंडूवर केकेआरच्या कर्णधाराची दिनेश कार्तिक केले.

यानंतर नॉर्खियाने पॅट कमिन्सला ( ५ ) बाद केले. केकेआरची ६ बाद १२२ धावा अशी बिकट अवस्था झाल्यानंतर मॉर्नगन आणि राहुल त्रिपाठी यांनी केकेआरचे आव्हान जीवंत ठेवले. मॉर्गनने आक्रमक खेळत संघाचे १६ व्या षटकात दिडशतक धावफलकावर लावले. मात्र ते वजियायी पाठलाग करू शकले नाहीत. आणि अखेर केकेआरचा डाव २१० धावांवर संपला. दिल्लीकडून नॉर्खियाने ३ हर्षल पटेलने २ तर रबाडा, स्टॉयनिस आणि मिश्राने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Protected Content