Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रकाश आंबेडकर यांना भेटीचे आमंत्रण 

uddhav prakash ambedkar

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना  भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार आज दुपारी एक वाजता प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, यानिमित्ताने आज पहिल्यांदाच आंबेडकर हे ‘मातोश्री’ची पायरी चढणार आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आजची भेट अनेकदृष्ट्या महत्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत राजकीय चर्चेसह भिमाकोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलीचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व नेत्यांना भेटून आपली सर्वसमावेशक प्रतिमा उभी करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

Exit mobile version