Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर सेतु सुविधा केंद्राची चौकशी करा ; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

जामनेर प्रतिनिधी । जामनेर शहरासह तालुक्यात अनेक सेतू सुविधा केंद्र असून या केंद्रावर विविध शासकीय काम करण्यासाठी येणाऱ्या नागरीकांकडून जास्तीचे पैसे घेऊन लूट केली जात आहे. त्यामुळे अशा या सेतु सुविधा केंद्राची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आला आहे.

या निवेदनावर नगरसेवक अनिस शेख नगरसेवक शेख रिजवान शेख लतीफ नगरसेविका नूरुद्दीन अमोद्दीन नगरसेविका रुया बी मुनाफ नगरसेविका बतुल बी शेख यासीन काँग्रेस कार्यकर्ता मुसा पिंजारी रुऊप शेख अहमद राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खालील जकी अ मुजफ्फर आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जामनेर शहरासह तालुक्यात सेतु सुविधा केंद्रावर विविध दाखले काढण्यासाठी नागरिक येतात मात्र यावेळी त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जातात त्यामुळे पुढील मागण्या साठी निवेदन देत आहोत 1)दाखल्यासाठी शासनाने दिलेले दर पत्रक सेतू सुविधा केंद्र धारक  यांनी लावले पाहिजे3) उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शासनाच्या दरानुसार 33 रुपये 60 पैसे दर ठरविण्यात आले असताना सेतू सुविधा केंद्र धारक हा नागरिकांकडून दाखल्याचे शंभर रुपये घेतात त्यामुळे शासनाने दिलेल्या दर पत्रकानुसार फी घेण्यात यावी 2) लहान मुलांना आधार कार्ड शासनातर्फे मोफत काढण्यात यावे असे आदेश असतानाही अनिल सेतू सुविधा केंद्र धारक त्यांच्याकडून शंभर रुपये घेतात 4) संजय निराधार विधवा अपंग वृद्धापकाळ या अर्जाच्या ऑनलाइन साठी शासनाने ते 30 रुपये 60 पैसे दर आकारले आहे मात्र सेतू सुविधा केंद्रावर त्यांच्याकडून शंभर रुपये घेतले जातात त्यामुळे शासनाने दिलेल्या दर पत्रकानुसार फी घ्यावी5) जामनेर तालुक्यात सेतू सुविधा केंद्र संघटना मजबूत असल्याने संगणमत करून नागरिकांकडून जास्तीचे पैसे घेतले जातात6) त्यामुळे सेतू सेवा केंद्रावर कामासाठी आलेल्या नागरिकां मी शासनाचे नियम सांगितले असता त्यांच्यावर शेतु सेवा केंद्र चालक दबंगगिरी करून तुमच्याकडे जे होईल ते करा अशी दम देतात याबाबत वेळोवेळी नगरसेवक रिजवान शेख यांनी तहसीलदार नायब तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे ऑडिओ क्लिप देऊनही कोणत्याच प्रकारे कारवाई केली जात नाही. त्यामुळे जामनेर तालुक्यातील मनमानी करणाऱ्या व नागरिकांकडून जास्तीचे पैसे उकळणाऱ्या सेतू सेवा केंद्रा ची चौकशी करून कारवाई झाली नाही तर आम्ही नगरसेवक व नागरिक जामनेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

 

Exit mobile version