Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करा : वंचितची मागणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील प्रभाग क्रमांक दोन मधील बुद्ध विहाराचे काम २०२२ मध्ये झाले होते. परंतु ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे एका वर्षातच ती भिंत पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे बांधकाम केलेल्या ठेकेदारावर कार्यवाही व्हावी याविषयी वंचित बहुजन आघाडी यांनी त्यावेळेस निवेदन दिल्याचे वृत्त आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की बोदवड तालुक्यातील प्रभाग क्रमांक दोन मधील बुद्धविहाराचे काम २०२१ मध्ये ३२ लाखाचे मंजूर झालेले होते.त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने काम सुरू असतांनाच हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे व्यवस्थित काम करावे अशा आशयाची तक्रार बोदवड नगरपंचायत ला दिलेली होती.

 

दरम्यान, बोदवड येथील संबंधित ठेकेदार व्यक्तीने व अधिकारी इंजिनियर यांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे आज रोजी बुद्धविहाराची भिंत पडण्याच्या मार्गावर आहे. ती भिंत पडू नये म्हणून त्या भिंतीला आज सपोर्ट लावलेले दिसत आहे. परिणामी हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होते त्यामुळे अशा ठेकेदारांना परत काम देऊ नये व जे काम बुद्ध विहाराचे केलेले आहे.ते परत नवीन पद्धतीने करावे अशी मागणी बोदवड येथील वंचित बहुजन आघाडीचे बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा निकम,  तालुका महासचिव सुभाष इंगळे ,जिल्हा संघटक सलीम शेख खलील, जिल्हा परिषद गटप्रमुख सोपान इंगळे, वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत सदस्य जितू सूर्यवंशी आदी जणांनी मागणी केली आहे.

Exit mobile version