Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग कार्यशाळा’ उत्साहात

2

जळगाव प्रतिनिधी । भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने कैवल्यधाम योग संस्थान लोणावळा येथे आयुष मंत्रालयाच्या सचिवांसमक्ष विविध योग संस्था प्रमुखांच्या उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत मू. जे महाविद्यालयाच्या योग विभाग संचालिका प्रा. आरती गोरे यांनी सुध्दा सहभाग नोंदविला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने 16 ते 21 जून या सप्ताहात विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आज रविवार १६ जून २०१९ रोजी मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँण्‍ड नॅचरोपॅथीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी योगासने, प्राणायाम प्रात्यक्षिक कार्यशाळा, अंतरंग साधना, मुद्रा विज्ञान प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 

शहरात विविध ठिकाणी झालेले कार्यक्रम
1. शुभारंभ रेसिडन्सी, वाघ नगर, 2.गाजरे हॉस्पिटल, नवीन बस स्टँड जवळ, 3. मायादेवी नगर, महाबळ, 4. मू. जे. महाविद्यालय चौक
5. बहिणाबाई उद्यान, 6. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, 7. विजय कॉलनी, 8. अशोक बेकरी रोड अशा विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुभारंभ रेसिडन्सी, वाघ नगर

 

बहिणाबाई उद्यान

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सदर कार्यक्रमात शहरातील सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविला आणि प्रात्यक्षिकासह योग विषयक माहिती जाणून घेतली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तिलोत्तमा गाजरे, डॉ. शरयू विसपुते, विक्रांत सराफ, जास्मिन गाजरे, पूनम बागल, उज्वला तिवारी, दीपा खैरनार, ज्योत्सना दांडगे, तन्मय गायकवाड, श्रद्धा व्यास, तुषार सोनवणे, योगेश भोळे, मनिषा पाठक, दीपा कोल्हे, विकास खैरनार, योगेश्वर पाटील, प्रा. अनंत महाजन, प्रा.ज्योती वाघ, प्रा.पंकज खाजबागे यांचे सहकार्य लाभले.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
१६ ते २१ जून या कालावधीत शहरात मू.जे.च्या योग विभागाद्वारे वल्लभ भूमी सभागृह, वल्लभ नगर येथे सकाळी 7 ते 8, यशवंत नगर येथे सकाळी 6 ते 7, रामचंद्र नगर येथे सकाळी 8 ते 9 या वेळात निःशुल्क योग शिबीर सुरू आहेत. या शिबिरामध्ये तसेच २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम आणि २१ जूनच्या मुख्य कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version