Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजीनाना महाविद्यालयात आंतरशालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात

c71ccc12 d26b 4c82 b97a 0672a24324f7

फैजपूर, प्रतिनिधी | येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजीनाना महाविद्यालयात नुकत्याच (दि.१६) आंतरशालेय जिल्हास्तरीय १४ वर्ष,१७ वर्ष आणि १९ वर्षाखालील खेळाडूंच्या धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन राजेन्द्र कोल्हे यांनी केल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.सतीश चौधरी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.वंदना बोरोले, सौ.मिनाक्षी कोल्हे, रायमल भिलाला, डॉ.गोविंद मारतळे आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजेन्द्र कोल्हे यांनी खेळातील सातत्य हे खेळाडूंना विजय प्राप्त करुन देते, त्याकरीता खेळाडूंनी नियमीत सराव करावा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.सतीश चौधरी यांनी धनुर्विद्या या खेळाचा इतिहास मुलांसमोर सांगितला. प्राचार्य डॉ.चौधरी यांनी आधुनिक युगात मनुष्याला यशस्वी करण्यासाठी खेळ किती उपयोगी आहे हे सांगितले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.वंदना बोरोले, सौ.मिनाक्षी कोल्हे, रायमल भिलाला, डॉ.गोविंद मारतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :-
१) १४ वर्षाखालील मुलांचा इंडीयन ऊडन राऊंड स्पर्धेचा निकाल- पृथ्वी परदेशी-उल्हास पाटील इंग्लीश मेडीयम स्कुल, सावदा ४२३ गुण मिळवुन प्रथम, रणधीर प्रविण राउत-स्वामी नारायण हायस्कुल सावदा ४०९ गुणांसह द्वितीय, हर्षल ईश्वर चौधरी- एस.ए.जी.हायस्कुल सावदा ४०० गुणांसह तृतीय. २) १४ वर्षाखालील मुलींचा इंडीयन ऊडन राऊंड स्पर्धेचा निकाल पुजा श्रीकांत वाणी- उल्हास पाटील इंग्लीश मेडीयम स्कुल, सावदा ५६४ गुण मिळवुन प्रथम, जिज्ञासा प्रशांत भारंबे- उल्हास पाटील इंग्लीश मेडीयम स्कुल, सावदा २५३ गुणांसह द्वितीय, सृष्टी अजय परदेशी- पी.व्ही.एम.हायस्कुल चोपडा २० गुणांसह तृतीय. ३) १७ वर्षाखालील मुलांचा इंडीयन ऊडन राऊंड स्पर्धेचा निकाल- गौरव प्रकाश चौधरी -उल्हास पाटील इंग्लीश मीडीयम स्कुल, सावदा ४२३ गुण मिळवुन प्रथम, निखिल संतोष पाटील -स्वामी नारायण हायस्कुल सावदा ४०१ गुणांसह द्वितीय, कृष्णल राजाराम पाटील – स्वामी नारायण हायस्कुल सावदा २४३ गुणांसह तृतीय. ४) १७ वर्षाखालील मुलींचा इंडीयन ऊडन राऊंड स्पर्धेचा निकाल श्रद्धा चंद्रकांत पाटील श्री.ना.वी.ह.पा., सावदा २६६ गुण मिळवुन प्रथम, दिक्षा परदेशी-उल्हास पाटील इंग्लीश मेडीयम स्कुल, सावदा १७८ गुणांसह द्वितीय, योगेश्वरी शांताराम ठोसरे – श्री.ना.वी.ह.पा. सावदा १४९ गुणांसह तृतीय. ५) १९ वर्षाखालील मुलांचा इंडीयन ऊडन राऊंड स्पर्धेचा निकाल- ओम बाळु कोळी-आ.ग. हायस्कुल, सावदा ४४३ गुण मिळवुन प्रथम, पार्थ विजय पाटील-स्वामी नारायण हायस्कुल सावदा ४३४ गुणांसह द्वितीय, प्रथमेश संजय कोळी- आ.ग.हायस्कुल सावदा ४२८ गुणांसह तृतीय. ६) १९ वर्षाखालील मुलींचा इंडीयन ऊडन राऊंड स्पर्धेचा निकाल यज्ञेशा प्रकाश पाटील- इंग्लीश मेडीयम हायस्कुल, डोनगाव प्रथम, डिंपल चेतन सरोदे- इंग्लीश मेडीयम हायस्कुल, डोनगाव द्वितीय, ७) १९ वर्षाखालील मुलांचा रिकर्व राऊंड स्पर्धेचा निकाल- विवेक भागवत आजनसोडे-आ.ग. हायस्कुल, सावदा ५१८ गुण मिळवुन प्रथम, जयेश गोपाळ बळगुर्जर –पी.वी.एम. हायस्कुल चोपडा १८ गुणांसह द्वितीय, मंदार विनोद पाटील बालमोहन उच्च माध्यमिक हायस्कुल चोपडा – ०९ गुणांसह तृतीय. ८) १९ वर्षाखालील मुलींचा रिकर्व राऊंड स्पर्धेचा निकाल – सृष्टी राजेन्द्र कोल्हे- धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर ५८९ गुणांसह प्रथम व जागृती नरेंद्र तायडे डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मेडीयम स्कुल सावदा ४९८ गुणांसह द्वितीय. ९) १७ वर्षाखालील कंपाऊंड प्रकारात ०६ मुलांनी सहभाग घेतला त्यापैकी निशांत अरुण राठोड डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मेडीयम स्कुल सावदा याने ५७२ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला याव्यतिरिक्त एकाही खेळाडूला एकही गुण मिळवता आला नाही.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप बोदडे यांनी केले व आभार प्रा.सचिन पाटील यांनी मानले. सुत्र संचालन प्रा.डॉ.गोविंद मारतळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग तसेच क्रीडा विभागातील डॉ.जी.एस.मारतळे, आर.डी.ठाकुर, युवराज गाढे, योगेश तडवी आणि शांती विद्यामंदीराचे खेळाडू यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version