Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखंडता एकता सायकल रॅलीचे भुसावळात जोरदार स्वागत

भुसावळ प्रतिनिधी । गडचिरोली येथून अखंडता एकता सायकल रॅलीचे भुसावळ शहरात फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. यावेळी भुसावळ शहर ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी गजबजले होते.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथून राष्ट्रीय एकता सायकल रॅलीचे सुरुवात करण्यात आली या सायकल रॅलीचे आज सायंकाळी येथील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर रॅलीतील जवानांचे भुसावळ येथील महिलांनी व पुरुषांनी पुष्पवृष्टी व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व पुढील प्रवाहास शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी भुसावळ वाशी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी भुसावळ ते डी वाय एस पी सोमनाथ वाकचौरे यांनीही सायकल रॅलीचे स्वागत केले.

 

 

Exit mobile version