एकत्रित संगणकीकरण – विद्यापीठात टीसीआयएल कंपनीच्या प्रस्तावाचे सादरीकरण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकत्रित संगणकीकरण करण्याच्या दृष्टीने भारत सरकाच्या टीसीआयएल कंपनीने आपल्या प्रस्तावाचे सादरीकरण केले.

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात टीसीआयएलच्या सह महाव्यवस्थापक श्रीमती शिखा सिंह यांनी कशा पध्दतीने संगणकीकरणाच्या सुविधा देता येतील याबाबतची सविस्तर माहिती दिली. कंपनीचे अतिष बियाणी व प्रतिक बियाणी यांनी देखील या सॉफ्टवेअर विषयी माहिती दिली.

कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल यांनी प्रास्ताविक केले. सहायक पूर्वलेखक जितेंद्र शिरसाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुरेखा पाटील यांनी आभार मानले.

देशभक्ती जोपासली तर सावरकरांच्या स्वप्नातील भारत घडेल – अभिनेता योगेश सोमण

Protected Content