Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवडच्या पत्रकारास अपमानास्पद वागणुक; यावल पत्रकार संघातर्फ निषेध

यावल प्रतिनिधी ।  बोदवड येथील लोकमतचे प्रतिनिधी गोपाळ व्यास आपल्या वृत्तसंकलनाच्या कार्यासाठी गेले असता पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक यांनी अपमानास्पद वागणुक दिल्याच्या घटनेचा भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्रच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. बोदवडचे पो. नि. गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघा महाराष्ट्रच्या वतीने पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोदवड येथील राहणारे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी गोपाळ व्यास हे एका गुन्ह्याच्या संदर्भातील वृत्तसंकलनासाठी बोदवड पोलीस स्टेशनला गेले असता व्यास यांनी अगोदर प्रसिद्ध केलेल्या एका बातमीचा त्यांच्यावर संताप व्यक्त करीत पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांनी गोपाळ व्यास यांना धक्के देत पोलीस स्टेशनमधून बाहेर निघ असे म्हणत अरेरावी केली व तुला किती बातम्या छाप्यायच्या आहेत, छाप माझे काही होत नाही व या पुढे या ठीकाणी यायचे नाही असा दमही दिला. 

अशा प्रकारे एका जबाबदार पत्रकार यांच्याशी अशी वागणुक देण्याऱ्या पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांचा जाहीर निषेध भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रच्या वतीने व्यक्त करण्यात येत असुन, अशा बेजबाबदार पोलीस निरिक्षकांवर वरिष्ठ पातळीवर योग्य ती तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली केली. या निवेदनावर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी. पटेल,  प्रदेश सचिव जिवन चौधरी , डी .बी . पाटील , सुनिल गावडे , शब्बीर खान सरवर खान , काबीज शेख समद , विक्की वानखेडे , बेबाबाई सुधाकर धनगर , लतीफ तडवी , सुधाकर धनगर आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहे .

 

Exit mobile version