Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाकू दाखवून लुटला ऐवज; बाजोरिया आईल रिफायनरीत धाडसी चोरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील मोंढाळा रोडवरील बाजोरिया आॅईल रिफायनरीत तीन अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करत सुरक्षा रक्षकास चाकुचा धाक दाखवत बाजोरिया आॅईल रिफायनरीतील आॅफीस मधुन ४ लाख ५ हजार रुपये रोख व १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना २३ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेवुन घटनास्थळाचा पंचनामा पाचोरा पोलिस ठाण्यात तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील मोंढाळे रोडवर आशिष बाजोरिया यांची बाजोरिया आॅईल रिफायनरी आहे. आशिष बाजोरिया यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आशिष बाजोरिया हे २२ जुलै रोजी आपले रिफायनरी व कृषक धान्य व्यवसायातुन जमा झालेले ४ लाख रुपये आॅफिसच्या कपाटीतील तिजोरीत ठेवुन दुपारी ४ वाजता खाजगी कामानिमित्त घरी गेले. दरम्यान घरी उशिर झाल्याने आशिष बाजोरिया हे सायंकाळी फॅक्टरीत न जाता घरीच थांबले. दरम्यान २३ जुलै रोजी पहाटे ४:१५ वाजता आशिष बाजोरिया यांना सुरक्षा रक्षक याने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईल वरुन फोन केला असता आलेला तो नंबर नविन असल्याने आशिष बाजोरिया यांशी उचलला नाही. मात्र थोड्यावेळाने ४:१५ वाजता शेजारील सिंधी बांधवाचा फोन आला यावेळी मात्र  आशिष बाजोरिया यांनी फोन उचलला व त्यांशा सांगण्यात आले की, आपल्या फॅक्टरीत चोरी झाली आहे. हे कळताच आशिष बाजोरिया यांनी घटनास्थळ गाठत असता त्यांना आॅफिसच्या कपाटातील तिजोरीत ठेवलेले ४ लाख रुपये तिजोरीसह आढळुन आले नाही.

 

आशिष बाजोरिया यांनी तात्काळ पाचोरा पोलिसांना पाचारण केले असता पाचोरा पोलिस घटना स्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा केला असता आशिष बाजोरिया व सुरक्षा रक्षक प्रकाश पाटील यांच्या माहितीनुसार तीन अनोळखी चोरटे तारेच्या जाळीवरुन आत प्रवेश करत ऑफीसमध्ये प्रवेश करत असतांना सुरक्षा रक्षक प्रकाश पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी त्यांचे जवळ असलेल्या चाकुचा धाक दाखवुन प्रकाश पाटील यांचे हात पाय बांधुन त्यांना एका ठिकाणी बसण्याची धमकी देवुन आॅफीस मधील गोदरेज कपाटाचा लाॅक तोडुन कपाटातील तिजोरीतील ४ लाख ५ हजार रुपये रोख, ६ हजार रुपये किंमतीचा सी. सी. टी. व्ही. चा डी. व्ही. आर. १ हजार रुपये किंमतीचे  सोनेरी पेपर वेट, पैसे ठेवलेली ५ हजार रुपये किंमतीची तिजोरी व सुरक्षा रक्षक प्रकाश पाटील यांचा १ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरुन पसार झाले. घटने प्रकरणी आशिष बाजोरिया यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

Exit mobile version