Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपा पदाधिकारी अन रेल्वे अधिकारी यांनी केली प्रस्तावित भोईटे नगर उड्डाण पुलाची पाहणी(व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 04 at 1.38.03 PM

जळगाव, प्रतिनिधी | शिवाजीनगर उड्डाणपूल पाडल्यानंतर तेथील रहिवाश्यांना रेल्वे रूळ ओलांडून किंवा भोईटे रेल्वे गेटकडून शहरात यावे लागते. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी आज मनपा पदाधिकारी व रेल्वे अधिकारी यांनी प्रस्तावित भोईटे नगर उड्डाणपूलसंदर्भात पाहणी केली.

आज आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, रेल्वेचे दीपककुमार गुप्ता यांच्या बैठकीचे आयोजन जळगाव रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते. या बैठकीनंतर स्थळ पाहणीत मनपाचे रेल्वे संदर्भातील मुद्यावर दिशा ठरविण्यात आली. यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ला माहिती देतांना सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी सांगितले की, ब्राह्मण सभेच्या बोगदाचे एस्टिमेट रेल्वे देणार आहे. देवकर निवास ते ख्रिस्ती कब्रस्तान यासाठीचा फुट ओव्हरब्रिजचा प्रस्ताव मनपाने रेल्वेकडे सादर केला असता तो होऊ शकतो असा प्राथमिक अहवाल रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे. ते लवकरात लवकर या ब्रिजचे एस्टिमेट मनपाला देणार असून यासाठी निधीची तरतूद मनपाला करावी लागणार आहे असे अॅड. हाडा यांनी सांगितले. रेल्वे हे काम ताबडतोब करून देणार आहे. या ब्रिजमुळे शिवाजीनगरवासीयांना रेल्वे रूळ ओलांडून यावे लागते तो त्यांचा त्रास थांबणार आहे. प्रस्तावित पिंप्राळा उड्डाणपूल हा पिंप्राळाच्या नागरिकांना वापरता येणार नव्हता तो नागरिकांना वापरता यावा अशी स्थानिक नगरसेवकांची मागणी होती. यानुसार स्थळपाहणी करण्यात आली असून नागरिकांची कमीत कमी जमीन जाऊन आर्म बसू शकत आहेत ही बाब स्थानिक नगरसेवकांनी या पाहणीत निदर्शनास आणून दिले असून यानुसार रेल्वे लवकरात लवकर डिझाईन बनवून देणार आहे. ही पाहणी रेल्वेचे दीपककुमार गुप्ता व पथक, रेल्वेचे स्थानिक पथक यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक मयूर कापसे, कुलभूषण पाटील, शोभा बारी, प्रतिभा देशमुख, सरिता नेरकर, विजय पाटील, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे आदी उपस्थित होते. तसेच यावेळी मनपाचे प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, बांधकाम विभागाचे सुनील भोळे, नगररचना विभागाचे इस्माईल शेख आदी उपस्थित होते.

Exit mobile version