Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा शहरातील कृषी केंद्रांची भरारी पथकाकडून तपासणी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील कृषी निविष्ठा विक्रेते यांची आज तालुकास्तरीय भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली.

शहरातील पारस कृषी सेवा केंद्र, न्यु जैन अॅग्रो एजन्सी, परेश कृषी केंद्र, धनश्री अॅग्रो एजन्सी, श्री गणेश कृषी केंद्र या विक्री केंद्रांची तपासणी करून प्राथमिक आढळून आलेल्या त्रुटींबाबत संबंधितांना लेखी सूचना देवून शेतकऱ्यांना सर्व निविष्ठा (बियाणे, खते, कीडनाशके) शासनाने ठरवून दिलेल्या दराने विक्री करणे, साठा रजिस्टर व ऑनलाईन परवाना अपडेट करुन त्यात विक्री करावयाचे सर्व ग्राहकांचे “ओ” फार्म / ग्रामप्रमाण पत्रे ऑनलाईन पद्धतीने अपडेट करणे, दरपत्रक बोर्ड, बिले खरेदीदारांना देवुन त्यावर सही घेणे यासारख्या सुचना करण्यात आल्या.

याच प्रमाणे तालुक्यातील सर्व केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. शिवाय कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे आदेशानुसार कापुस बियाणे विक्री दि. १ जुन नंतरच करावी. कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत व मान्यता नसलेले बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर तपासणी वेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी तथा भरारी पथक सदस्य सचिव एम. एस. भालेराव, मंडळ कृषी अधिकारी ए. व्ही‌. जाधव, कृषी सहाय्यक आर. बी. चौधरी उपस्थित होते.

Exit mobile version